@कोव्हिड योद्धांसाठी सत्कार सोहळा।अ.भा.म.चि.महामंडळाचे मा.अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते
COVID19, Corona Warriors, Corona Virus, Helping Hand, Felicitation of Corona Warriors, by Meghraj Rajebhosale, Hon'ble President of Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal, Artists from the entertainment industry, Organized by Samyak Film Pariwar.
सह्याद्री करीअर अकॅडमी, बारामती येथे सम्यक फिल्म परीवार या कलाकार संस्थेच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा कलाकार व तंत्रज्ञांच्या वतीने सम्यक फिल्म परीवारचे प्रमुख व चित्रपट निर्माता दिग्दर्शक सचिन रणपिसे यांच्या माध्यमातून सत्कार सोहळा पार पडला. यावेळी कोरोना लाॅकडाऊन काळात कलाक्षेत्र ठप्प झाल्यामुळे अडचणीत आलेल्या कलाकारांना मदत केलेल्या तसेच कोरोना लढ्यात जनसेवा केलेल्या व्यक्तींना कलाकार व तंत्रज्ञांच्या वतीने कोव्हिड योध्दा सन्मान पत्र मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते दिले गेले.
यावेळी शशिकला फिल्म इंस्टिट्युट बारामतीचे चेअरमन तथा राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे प्रदेश युवा अध्यक्ष रविराज खरात,
चित्रपट अभिनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणिस महेशदादा देवकाते,
जय भूमीहिन सामाजिक व बहुऊद्देशिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल माने पाटील,
चित्रपट निर्माता राहुल घाडगे,
सामाजिक कार्यकर्ते विजय सोनवणे (डॅडी)
चित्रपट निर्माता शिवकुमार गुणवरे,
चित्रपट निर्माता प्रशांत शिंगटे
सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक संतोष रूपनवर
आदी मान्यवर ऊपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी कलाकार व तंत्रज्ञांच्या अडचणी समजून घेऊन ऊपस्थित कलाकार तंत्रज्ञांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजन सम्यक फिल्म परीवारचे संचालक गणेश खंडागळे यांनी केले. यावेळी सम्यक फिल्म परीवारचे एम डी भारत चव्हाण यांचा त्यांना नुकताच राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
ABMCM NEWS's video:
15
0