×

Amol Warade vlogs's video: renuka mata temple chandwad nashik maharastra

@renuka mata temple chandwad |nashik | maharastra
renuka mata temple chandwad nashik maharastra रेणुका माता मंदिर चांदवड नाशिक माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली’ असे जिचे यथार्थ वर्णन करण्यात आले आहे, त्या रेणुकादेवीचे स्थान नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे आहे. रेणुकादेवीचे मंदिर आग्रारोडला लागूनच आहे. मंदिर डोंगरात कोरलेले आहे. खरं तर ती एक गुहाच आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आग्रारोड चांदवडच्या ज्या डोंगरावरून पुढे मालेगावकडे जातो त्याच्या खालीच ही मंदिराची गुहा आहे. मंदिराचा कळस आग्रारोडवरच आहे.  रेणुकादेवीचे स्थान चांदवडला कसे स्थापन झाले याची एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी-  रेणुका ही माहूरगडावर आश्रम असलेल्या जमदग्नी नावाच्या अतिशय कोपिष्ट ऋषींची पत्नी. परशुराम हा जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र. तो परमपितृभक्त होता. रेणुका पतिव्रता होती, ती रोज पतीचे पाय धुण्यासाठी नदीवरून पैठणीतून पाणी आणायची, एवढे तिचे पावित्र्य कठोर होते. एकदा ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणायला गेली असता तिथे जलक्रीडा करणारा राजा व त्याच्या स्त्रियांना पाहून तिच्या मनांत कामवासना जागृत झाली. तिला नदीवरून घरी येण्यास उशीर झाला. जमदग्नींची देवपूजा खोळंबून राहिली. रेणुकेच्या उशिरा येण्याचे कारण लक्षात येताच त्या कोपिष्ट ऋषींच्या रागाचा पारा चढला. रागाच्या भरातच दाराशी आलेल्या आपल्या पत्नीचे म्हणजेच रेणुकेचे मस्तक धडावेगळे करण्याची आज्ञा त्यांनी आपल्या मुलाला, परशुरामाला दिली.  परशुराम परमपितृभक्त होता. वडिलांच्या तोंडून शब्द निघताच त्याने परशु सरसावला आणि एका घावातच आपल्या मातेचे मस्तक धडावेगळे केले. रेणुकेचे मस्तक तिथून जे उडाले ते चांदवडला सध्या जिथे देवीचे मंदिर आहे तिथे येऊन पडले आणि धड माहूर येथेच राहिले. तेव्हापासून माहूर आणि चांदवड येथे रेणुकेची स्थापना झाली. आजही माहूरला रेणुकादेवीच्या फक्त पादुका, तर चांदवडला फक्त मस्तक पाहायला मिळते.  _____________________________________ _mata_mandir please subscribe my channel / / √ __________________________________

5

0
Amol Warade vlogs
Subscribers
1.1K
Total Post
51
Total Views
69.7K
Avg. Views
1.4K
View Profile
This video was published on 2019-12-29 11:24:28 GMT by @Amol-varade-vlog on Youtube. Amol Warade vlogs has total 1.1K subscribers on Youtube and has a total of 51 video.This video has received 5 Likes which are lower than the average likes that Amol Warade vlogs gets . @Amol-varade-vlog receives an average views of 1.4K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that Amol Warade vlogs gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Amol Warade vlogs #renuka_mata_mandir #Amolvaradevlog __________________________________ has been used frequently in this Post.

Other post by @Amol varade vlog