×

Amol Warade vlogs's video: 2 Vijaydurg fort

@#2 Vijaydurg fort | विजयदुर्ग एक अभेद्य किल्ला
Vijaydurg हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे. कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे हे एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार होते विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ मध्ये vijaydurg किल्ला जिंकला. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. ______________________________ विजयदुर्गला पोहचायचे कसे: विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे मुंबई गोवा महामार्गावरून तळेरे इथून उजवीकडे वळून ५२ किमी अंतरावर विजयदुर्ग आहे मुंबई व पुण्यावरून विजयदुर्ग इथे थेट जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे विजयदुर्ग हे सागरी महामार्गापासून १४ किमी आत आहे.नव्या रेवस रेड्डी सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग ते रत्नागिरी हे अंतर सुमारे ८० किमी ने कमी झाले आहे. विजयदुर्ग येथे व्हाया रत्नागिरी मार्गे हि जाऊ शकतो. रत्नागिरी,पावस,जैतापूर,कात्रादेवी,पडेल कॅन्टीन मार्गे रत्नागिरीहून विजयदुर्गला २ तासात पोहचता येते. ह्या नव्या सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग येथे पोहचण्याचे ३ तास वाचले आहेत.तेव्हा ह्या मार्गाचा हि पर्यायी मार्ग म्हणून वापर करू शकता.आणि समुद्रकिनारी सर्व गावांचे आणि_निसर्गाचे दर्शन घेत आपण विजयदुर्ग येथे पोहचाल._____________________________________ (जर तुम्हाला विडिओ किंवा माहिती आवडली असेल तर like share subcribe नक्की करा आणि 🔔ह्याला नक्की दाबा पुढच्या विडिओ साठी )

2

0
Amol Warade vlogs
Subscribers
1.1K
Total Post
51
Total Views
70.3K
Avg. Views
1.4K
View Profile
This video was published on 2018-08-24 12:41:23 GMT by @Amol-varade-vlog on Youtube. Amol Warade vlogs has total 1.1K subscribers on Youtube and has a total of 51 video.This video has received 2 Likes which are lower than the average likes that Amol Warade vlogs gets . @Amol-varade-vlog receives an average views of 1.4K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that Amol Warade vlogs gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Amol varade vlog