×

Checkmate Times's video: : : Warje

@कोणाच्याही दु:खात शाब्दिक सहभागी न होता थेट मदत करण्यासाठी कोविड सेंटर केले सुरु: सचिन दोडके | Warje
कोणाच्याही दु:खात शाब्दिक सहभागी न होता थेट मदत करण्यासाठी कोविड सेंटर केले सुरु: सचिन दोडके पुणे, दि. ९ (चेकमेट टाईम्स): 'कोरोना' विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफसह पहिल्या फळीतील कोरोना योध्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. ‘कोरोना’ संसर्गाच्या वाढत्या काळात वारजे-माळवाडी येथील कोविड सेंटरच्या माध्यमातून या भागातील 'कोरोना'च्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा-सुविधा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. वारजे-माळवाडी येथील आरएमडी कॉलेज मध्ये नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकारातून, खेनट हॉस्पिटलच्या सहकार्यातून सुरु झालेल्या 101 बेड क्षमतेच्या 'छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटर'चे ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे , अशोक पवार , सुनील शेळके , विभागीय आयुक्त सौरभ राव , पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार , पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त संतोष पाटील , जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख , नगरसेवक सचिन दोडके , सायली वांजळे यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टर व वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सचिन दोडके यांनी वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्याही दु:खात शाब्दिक सहभागी न होता, त्यांना थेट मदत करता यावी, यासाठी हे कोविड सेंटर सुरु केल्याचे सांगितले असून, येथील सर्व सेवा निशुल्क देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’ बाधित रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व यंत्रणांना युद्ध पातळीवर काम करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात येत आहे. नगरसेवक सचिन दोडके यांनी पुढाकार घेवून सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून वारजेसह आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होईल. या सेंटरमुळे वारजे माळवाडीसह या परिसरातील रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा व दिलासा मिळेल, असे सांगून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाल्यावर या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड व्यवस्था होण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, मास्क वापरणे आवश्यक असून कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड सेंटरची सविस्तर माहिती घेतली. तसेच कोविड सेंटर सुरु झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. follow us on facebook : https://www.facebook.com/checkmatetimes/ follow us on instagram : https://www.instagram.com/checkmate_times/?fbclid=IwAR3KYAHPP0t3MRS-_Vcs35pF-obf-76cpAu9Fy02YNndJCwgC2_PL4HGSYo for business or any news related inquiries email us: ctnnpune@gmail.com #चेकमेट_टाईम्स

16

1
Checkmate Times
Subscribers
159K
Total Post
2.7K
Total Views
214.1K
Avg. Views
1.3K
View Profile
This video was published on 2021-05-09 19:35:07 GMT by @Checkmate-Times on Youtube. Checkmate Times has total 159K subscribers on Youtube and has a total of 2.7K video.This video has received 16 Likes which are lower than the average likes that Checkmate Times gets . @Checkmate-Times receives an average views of 1.3K per video on Youtube.This video has received 1 comments which are lower than the average comments that Checkmate Times gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Checkmate Times #WarjeMalwadiCovidCentre #AjitPawar #ChhatrapatiShivajiMaharajCovidCentrePune #SunilTingare, #AshokPawar, #SunilShelke, #SaurabhRao, #VikramKumar, #SantoshPatil, #RajeshDeshmukh, #SachinDodke, #SayaliWanjale #FreeCovidCentrePune उपमुख्यमंत्री #CHECKMATETIMES #checkmatetimes #CheckmateTimes #चेकमेट_टाईम्स #PuneNews #NewsPune #LocalNews has been used frequently in this Post.

Other post by @Checkmate Times