@भारतभूषण बराटे यांच्या प्रयत्नातून मारुतीराय कोविड केअर सेंटरचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण
भारतभूषण बराटे यांच्या प्रयत्नातून मारुतीराय कोविड केअर सेंटरचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे, दि. २० (चेकमेट टाईम्स): दोन तीन महिन्यांपूर्वी देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारी मध्ये पुणे आणि महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मात्र प्रशासनासह पुण्यातील सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी करून दाखवलेल्या कामामुळे आज देशात पुणे आणि महाराष्ट्राकडे कोविड वर मात करण्याबाबत, लसीकरणाचेही रोल मॉडेल म्हणून पाहिले जात असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. वारजे मधील श्री मारुती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आणि भारतभूषण शरद बराटे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या १०९ बेड क्षमतेच्या मारुतीराय कोविड केअर सेंटरच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी आरएसएसचे चित्तरंजन भागवत RSSChittaranjanBhagwat, बाळासाहेब दळवी यांच्यासह नगरसेवक दिलीप बराटे , माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ , ट्रस्टचे अध्यक्ष शरद बराटे , सचिन बराटे , सुभाष चौधरी, डॉ प्रफुल तामसकर, डॉ सुजित शिंदे, प्राचार्या स्नेहल चाऊस यांच्यासह वारजे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मारुतीराय कोविड केअर सेंटर मधील बेड स्थिती जाणून घेण्यासाठी ९० २८ ५९ ३० ६४ / ९० २८ ५९ २९ ७२ वर संपर्क करू शकता,
follow us on facebook : https://www.facebook.com/checkmatetimes/
follow us on instagram : https://www.instagram.com/checkmate_times/?fbclid=IwAR3KYAHPP0t3MRS-_Vcs35pF-obf-76cpAu9Fy02YNndJCwgC2_PL4HGSYo
for business or any news related inquiries email us: ctnnpune@gmail.com
#चेकमेट_टाईम्स
Checkmate Times's video:
47
5