×

Dadar trekkers's video: Malang gad chanderi irshal peb fort Vikat gad

@मलंगगड, चंदेरी, ईरशाळ गड, विकट गड थरारक वाटा | Malang gad | chanderi | irshal | peb fort | Vikat gad
१) मलंगगड किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : ठाणे डोंगररांग: माथेरान श्रेणी : अत्यंत कठीण किल्ल्याची ऊंची : 3200 मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ किमी अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. हाजीमलंग या नावाने हा डोंगर ओळखला जातो. आज हाजीमलंगला अनेक हिंदु- मुस्लिम भाविक जातात. त्यापैकी फारच थोडेजण किल्ल्याच्या दुसर्‍या माची पर्यंत जातात. तर गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कराव्या लागणार्‍या साहसामुळे (प्रस्तरारोहणामुळे) केवळ गिर्यारोहकच गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जातात. मुंबई शहारापासून अगदी जवळ असूनही दुर्लक्षित असलेल्या या पूरातन किल्ल्याला दैदिप्यमान इतिहास आहे. किल्ल्यावर पूरातन अवषेश आजही तग भरुन उभे आहेत. तसेच किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्या करीता कराव्या लागणार्‍या साहसामुळे किल्ल्याची चढाई थरारक होते. मलंगगडाच्या दुसर्‍या टप्प्यापर्यंत (माची पर्यंत) चढण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज लागत नाही. पण यापुढील टप्पा सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहणाचे साहित्य बरोबर असणे व तंत्र माहित असणे आवश्यक आहे. २) चंदेरी किल्ला किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : ठाणे डोंगररांग: माथेरान श्रेणी : कठीण किल्ल्याची ऊंची : 2300 feet मुंबई - पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना उजवीकडे एक डोंगररांग दिसते, ती म्हणजे बदलापूर डोंगररांग .नाखिंड, चंदेरी, म्हैसमाळ, नवरी, बोयी, पेब , माथेरान ही शिखरे याच डोंगररांगेत येतात. या डोंगररांगेत आपला भलाथोरला माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका दिसतो, त्या किल्ल्याचे नाव आहे "चंदेरी". बदलापूर - वांगणी स्थानका दरम्यान बदलापूर - कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीची वाट आहे. ३) ईरशाळ गड किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : रायगड डोंगररांग: माथेरान श्रेणी : मध्यम किल्ल्याची ऊंची : 3700 ईरशाळगड हा कर्जत विभागात येणारा किल्ला आहे.गडावरील विशाळादेवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव ईरशाळगड झाले असावे. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण - पुणे लोहमार्गावरून जातांना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हैसमाळ, प्रबळगड, ईरशाळगड हा परिसर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. या परिसरातील जनजीवन तसे सर्वसामान्यच आहे पावसाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे सर्वत्र भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाने जाण्याची सोय होते. ४) पेब ( विकट गड ) किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : रायगड डोंगररांग: माथेरान श्रेणी : मध्यम किल्ल्याची ऊंची : 2100 पनवेलच्या ईशान्येला, मुंबई - पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन - चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला (विकटगड) आहे. गडाखालच्या पेबी देवी वरून या किल्ल्याचे नाव पेब ठेवण्यात आलेले असावे. माथेरान सारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणा जवळ, पण माणसांच्या गर्दीपासून दूर असलेला पेबचा किल्ला एका दिवसाच्या ट्रेकसाठी आदर्श जागा आहे. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट, वरील गुहेची रचना, गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड अजोड आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ, माथेरान, पनवेल या तिनही ठिकाणांहून वाटा आहेत. _____________________________________________ #शिलेदार #गडकिल्ले_महाराष्ट्राचे #गडकिल्ले #रानवाटा #शिवरायांचे_मावळे #हिंदवी_स्वराज्य #सह्याद्रीkkers _saundarya #गडकिल्ले_भ्रमंती _maharashtra_trekking _trekking_group #भटकंती_सह्याद्रीची #स्वराज्यातील_गडकिल्ले _trekking_group _lover

43

5
Dadar trekkers
Subscribers
2.8K
Total Post
69
Total Views
270.7K
Avg. Views
5.1K
View Profile
This video was published on 2020-04-24 19:39:25 GMT by @Dadar-trekkers on Youtube. Dadar trekkers has total 2.8K subscribers on Youtube and has a total of 69 video.This video has received 43 Likes which are lower than the average likes that Dadar trekkers gets . @Dadar-trekkers receives an average views of 5.1K per video on Youtube.This video has received 5 comments which are lower than the average comments that Dadar trekkers gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Dadar trekkers #trekkinginsahyadris #maharashtratrek #sahyadri #malanggad #trekk #maharashtra #pointbreakadventure #dadartrekkers #mountain #maharashtratrekkers #chanderi #irshalgad #pebfort #vikatgad #climbing #hippieinhills #naturelover #adventure #hikingadventures #travelblogger #trekkingday #trekkingbrasil #trekkingitalia #trekkingchile #trekkinglovers #trekkinglife #trekkinginnepal #trekkingtoes #trekkingtime #trekkingturkey #trekkingtour #trekkingdiaries #trekkingandphotography #trekkingperu #trekkingestilodevida #Gorakhgad #ITR #शिलेदार #गडकिल्ले_महाराष्ट्राचे #गडकिल्ले #रानवाटा #शिवरायांचे_मावळे #हिंदवी_स्वराज्य #सह्याद्रीkkers #sahyadriche_saundarya #गडकिल्ले_भ्रमंती #adventure_maharashtra_trekking #sahyadri_trekking_group #भटकंती_सह्याद्रीची #स्वराज्यातील_गडकिल्ले #nashik_trekking_group #hiking_lover #hiking has been used frequently in this Post.

Other post by @Dadar trekkers