×

Dadar trekkers's video: Harishchandragad Trek Trek Nalichi vaat Kokankada Maharashtra

@Harishchandragad Trek| हरिश्चंद्रगड Trek | Nalichi vaat | Kokankada | Maharashtra
ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पाश्वर्भूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पाश्वर्भूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे , तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाइची खिंड , आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो.अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो. ____________________________________________ Facebook page⬇️ https://www.facebook.com/Dadar-trekkers-138063266886047/ Instagram as @dadartrekkers. https://www.instagram.com/invites/contact/?i=151w305wxhvpj&utm_content=5murpue

107

14
Dadar trekkers
Subscribers
2.8K
Total Post
69
Total Views
270.9K
Avg. Views
5.1K
View Profile
This video was published on 2018-12-17 15:53:47 GMT by @Dadar-trekkers on Youtube. Dadar trekkers has total 2.8K subscribers on Youtube and has a total of 69 video.This video has received 107 Likes which are lower than the average likes that Dadar trekkers gets . @Dadar-trekkers receives an average views of 5.1K per video on Youtube.This video has received 14 comments which are lower than the average comments that Dadar trekkers gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Dadar trekkers