×

Dadar trekkers's video: Tahuli Fort Tahuli Trek Tahuli Peak Kushivali

@Tahuli Fort | Tahuli Trek | Tahuli Peak | Kushivali | ताहुली ट्रेक एक हरवलेली वाट ...
ताहुली किल्ला किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माथेरान जिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम किल्ल्याची ऊंची : 3487 फूट माथेरान डोंगररांगेत हा डोंगर आहे. हा डोंगर त्याच्या तीन सुळक्यांमुळे प्रसिद्ध आहे. उंच बेलाग कडे, जाण्याच्या अनगड वाटा यामुळे ताहुली वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच दुर्लक्षितही आहे. पहाण्याची ठिकाणे : ताहुलीच्या पठारावर संत गाडगेबाबा महाराजांचा मठ आहे. या वाटेत आणखी दोन आश्रम लागतात. पठाराच्या सर्वात वरच्या भागाला ’दादीमा ताहुली’ म्हणतात. येथे ५ पीर आहेत. समोरच एक छोटेसे घर देखील आहे. याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तासात आपण ताहुलीच्या सुळक्यापाशी पोहोचतो. एका सुळक्याचे नाव ’दाऊद’ तर दुसर्‍यांचे नाव ’बामण’ आहे. पोहोचण्याच्या वाटा : ताहुलीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. १) अंबरनाथहून :- अंबरनाथ स्थानकात उतरून पूर्वेला बाहेर पडावे. रिक्षा किंवा बसने बदलापुर (पाईप लाईन रोड) रस्ता ओलांडावा. येथे काकुली नावाचा तलाव आहे. इंग्रजांनी बांधलेल्या या तलावातून कल्याण स्थानकात येणार्‍या कोळशाच्या रेल्वे इजिंनाना पाणी पुरवले जात असे. त्यासाठी वापरण्यात येणारी १९१४ साल (वर्ष) कोरलेली पाईप लाईन आजही पाहायला मिळते. या काकुली तलावापासून थोड्याच अंतरावर एक डोंगराची सोंड वर ताहुलीच्या तीन सुळक्यांपाशी पोहोचते. या वाटेने ताहुली पठार गाठण्यास ४ तास लागतात. २ कुशीवलीहून :- कल्याण - मलंगगड रोडवर कुशीवली गावाच्या स्टॉपवर उतरावे. गावाच्या बाहेरूनच थेट बैलगाडी जाईल एवढी मोठी वाट ताहुलीला गेली आहे. ही वाट दोन डोंगराच्या बेचक्यामधून वर चढते. कुशीवली गावापासून वर पठारावर जाण्यास अडीच तास लागतात. 🚩Facebook page⬇️ https://www.facebook.com/Dadar-trekkers-138063266886047/ 🚩Instagram as @dadartrekkers.⬇️ https://www.instagram.com/invites/contact/?i=151w305wxhvpj&utm_content=5murpue

33

4
Dadar trekkers
Subscribers
2.9K
Total Post
72
Total Views
273K
Avg. Views
4.9K
View Profile
This video was published on 2023-11-16 18:00:20 GMT by @Dadar-trekkers on Youtube. Dadar trekkers has total 2.9K subscribers on Youtube and has a total of 72 video.This video has received 33 Likes which are lower than the average likes that Dadar trekkers gets . @Dadar-trekkers receives an average views of 4.9K per video on Youtube.This video has received 4 comments which are lower than the average comments that Dadar trekkers gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Dadar trekkers