×

Dadar trekkers's video: - Visapur Fort Trek Lonavala Malavli

@🚩भाग - १ | विसापूर किल्ला | भव्यदिव्य अशी पसरलेली तटबंदी | Visapur Fort Trek | Lonavala | Malavli
किल्ले - विसापूर 🚩 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम __________________________________________ मुंबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की, लोहगड-विसापूर ही किल्ल्यांची जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो लोहगड, मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा हा विसापूर किल्ला, लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता. __________________________________________ इतिहास : विसापूर किल्ल्याबाबत एतिहासिक कागदपत्रांमध्ये पुढिल माहिती मिळते, मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहोचला. तेथे झालेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले , तो पाठलाग करत तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहोचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. __________________________________________ पहाण्याची ठिकाणे : पायर्‍यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे. __________________________________________ पोहोचण्याच्या वाटा : मुंबई - पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत. १) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाड्या घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पायर्‍यांपाशी पोहोचतो येथे बाजूलाच एक मंदिर आहे. २) दुसर्‍या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते. ३)मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे. __________________________________________ 🚌Travel Bug 🚩Instagram @travel_bug https://instagram.com/travel.bug.in?igshid=YmMyMTA2M2Y= __________________________________________ 🚌Dadar trekkers 🚩Facebook page⬇️ https://www.facebook.com/Dadar-trekkers-138063266886047/ 🚩Instagram as @dadartrekkers.⬇️ https://www.instagram.com/invites/contact/?i=151w305wxhvpj&utm_content=5murpue __________________________________________ हॉटेल शिवकृपा 🏨 +918390739304 __________________________________________ @VinayakParabvlogs @JeevanKadamVlogs @sunilmalivlog @aniruddhapatil6846 @TravellerBidur @psychoprashil

121

33
Dadar trekkers
Subscribers
2.8K
Total Post
69
Total Views
270.8K
Avg. Views
5.1K
View Profile
This video was published on 2022-07-14 17:00:10 GMT by @Dadar-trekkers on Youtube. Dadar trekkers has total 2.8K subscribers on Youtube and has a total of 69 video.This video has received 121 Likes which are lower than the average likes that Dadar trekkers gets . @Dadar-trekkers receives an average views of 5.1K per video on Youtube.This video has received 33 comments which are higher than the average comments that Dadar trekkers gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Dadar trekkers #visapur #malavli #lonavala #gadkille #sahyadri has been used frequently in this Post.

Other post by @Dadar trekkers