×

Fun Masti & News's video: Mumbai Police Nakki wrong kon

@Mumbai Police Nakki wrong kon मित्रांनो, "मुंबई पोलीस" हा विषय खूप चर्चेत आहेच
मित्रांनो, "मुंबई पोलीस" हा विषय सुशांतसिंग राजपूत आणि कंगना राणावत प्रकरणापासून खूप चर्चेत आहेच आणि नक्कीच चांगली आणि वाईट बाजू देखील आहे ह्या मुंबई पोलिसांची आणि नक्कीच कंगना राणावत जे बोलत आहे ते कदाचित बरोबरच असावे. आज दिनांक ६/९/२०२० रोजी आमची माई कोरोना तथा कार्डियो अटॅक मुळे मृत पावली आणि तिच्या मयताला आम्ही दौलतनगर, बोरीवली येथील स्मशानभुमीत कुटुंबीय उपस्थित होतो. तिथे आमची बहीण तिच्या आईच पार्थिव बघून चक्कर येऊन कोसळली, बरेच प्रयत्न करुन देखील नॉर्मल होत नाही हे बघून आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला तसेच रिक्षा मिळत नसल्याने परिवारातील ६ जण तसेच ती असे आम्ही काकाच्या मारुती इको गाडीने हॉस्पिटलसाठी त्वरित निघालो. आम्ही सारे ओमकारेश्वर मंदिर, नॅशनल पार्क येथे पोहोचलो असता तेथील नाकाबंदीमध्ये आमची गाडी अडवण्यात आली. तेथील पोलीसांना आम्ही मयतावरुन आलो आहोत तसेच बहीनीची सारखी शुद्ध हरपत आहे व तिला डॉक्टरची गरज असल्याने हॉस्पिटलला त्वरित घेऊन जायचे आहे असे सांगितले. परिस्थिती इतकी नाजुक असताना देखील त्यांनी आम्हाला गाडी बाजूला लावायला लावून गाडीचे पेपर दाखवा, परवाना दाखवा इत्यादि चौकशी करताना गाडीची चावी व लायसन्स देखील काढून घेतले व उपचारासाठी गरजेची असणारी बहुमूल्य १५-२० मिनिटे वाया घालवली, त्यांना आम्ही विनंती केली की हॉस्पिटलला दाखल करुन आम्ही बाकी सहकार्य करायला परत येऊ, पण कदाचित सामान्य माणसाच्या भावना, विनंत्या त्याच्या सद्सद्विवेक बुद्धिपर्यन्त पोहोचल्याच नाहीत. मदत करण्याऐवजी अरे-रावीची भाषा वापरण्यात आली. शेवटी प्रकरण वाढल्यावर त्यांनी धक्काबुक्की करण्यास तसेच कायद्याच्या धाक दाखवयला सुरुवात केली. याप्रकरणी अकर्तव्यनिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सयाजी बाबूशा कोळेकर यांनी मोठ्या पदावर असून देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गाडीत अत्यावस्थ अवस्थेत एक मुलगी दिसत असून ही गाडीला ओपन कॉरिडोर देण्याऐवजी आमच्या मोठ्या बंधुशी धक्काबुक्की तसेच त्यांची त्यांची कॉलर पकडून त्यांना मारण्याची भाषा वापरण्यास सुरुवात केली. तसेच त्यांचे शब्द काहीसे ऐसे होते की तुझ्यावर अशी केस टाकेन की तुला उजेड बघायला मिळणार नाही, नॉन बेलेबल केस करेन. आणि हे सर्व होताना फक्त एक पोलीस अधिकारी सोडून बाकी सगळे तमाशा बघण्यात तसेच वीडियो काढण्यात व्यस्त होते. शेवटी जमावाने आम्हास सोडवून पुढे जाण्यासाठी मोकळा रस्ता करुन दिला व आम्ही बहिणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकलो. अष्टविनायक हॉस्पिटलमधील आय. सी. यू. मध्ये उपचार झाले म्हणून पुढील अनर्थ टळला सोबत डॉक्टरने दिलेली कॉपी जोडत आहे. मयतावरुन परत येताना एखाद्या परिवाराची मानसिक स्तिथी काय असते तसेच जशी आमच्यावर मेडिकल इमर्जन्सी आली तशी कोणावर आलेली असु शकते पण ह्यातून सामान्य माणसांना कसे सोडवायचे ह्यापेक्षा त्यांना त्यात कसे अडकवायचे ह्याचे भान मुंबई पोलिसांना अधिक असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलीसांना आम्ही सन्मान नक्कीच देतो पण काही अश्या पोलिस अधिकार्यामुळे सगळ्या पोलिस प्रशासनावर प्रश्न चिन्ह ऊभ रहात त्या साठी काही कडक कायदा हा पोलिस प्रशासनासाठी पण असावा. आम्हाला पडलेले काही प्रश्न: १. जर तिचे काही बरे-वाईट झाले असते तर त्याला जवाबदार कोण ठरल असत? २. मेडिकल इमर्जन्सीच्या वेळेस परिस्थिती दिसत असून देखील कागदपत्रे दाखवण्यात वेळ वाया घालवायचा नसतो इतकी बुद्धी ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नाहीये/नसते का? ३. सर्व नियम मध्यमवर्गीय-कनिष्ठवर्गीय ह्यांच्यासाठी आहेत का? ४. हे जे नव्याने भरती होणारे पोलीस कर्मचारी फक्त रुबाब झाडण्यासाठी होत आहेत का? ५. पोलिसांची माणूसकी संपली अस समजायच का? ६. नाकाबंदी ही सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी असते की स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेण्यासाठी?

9

0
Fun Masti & News
Subscribers
3.1K
Total Post
129
Total Views
13K
Avg. Views
168.4
View Profile
This video was published on 2020-09-12 22:20:19 GMT by @Fun-Masti-&-News on Youtube. Fun Masti & News has total 3.1K subscribers on Youtube and has a total of 129 video.This video has received 9 Likes which are lower than the average likes that Fun Masti & News gets . @Fun-Masti-&-News receives an average views of 168.4 per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that Fun Masti & News gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.Fun Masti & News #breakingnews #Mumbai #Maharastra मुंबई has been used frequently in this Post.

Other post by @Fun Masti & News