×

Kids Marathi's video: Bhagwan Gautam Buddha - Inspirational Story in Marathi -- 1

@Bhagwan Gautam Buddha | भगवान गौतम बुद्ध - प्रेरणादायक गोष्ट | Inspirational Story in Marathi -- 1
Bhagwan Gautam Buddha | भगवान गौतम बुद्ध - प्रेरणादायक गोष्ट | Inspirational Story in Marathi सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती.सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती. सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले. धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र- सौख्यास कांहीही कमी नाही असे २९ वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते. एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या - चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱयाया जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्र्य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या साऱ्या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला. त्यानंतर त्याने एक संन्यासी त्याने पाहिला आणि त्याची झोप उडाली, सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्‍नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्ध राजवाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंठक नामक घोड्यासह उभा होता. चन्‍नाने कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खूर कापडात बांधले होते. सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला ► Top १० मराठी बालगोष्टी : http://bit.ly/MarathiBalgoshti ► इंग्रजी गोष्टींसाठी: http://bit.ly/EnglishKidsStories

7

0
Kids Marathi
Subscribers
633K
Total Post
652
Total Views
2M
Avg. Views
32.5K
View Profile
This video was published on 2020-11-30 14:44:10 GMT by @Kids-Marathi on Youtube. Kids Marathi has total 633K subscribers on Youtube and has a total of 652 video.This video has received 7 Likes which are lower than the average likes that Kids Marathi gets . @Kids-Marathi receives an average views of 32.5K per video on Youtube.This video has received 0 comments which are lower than the average comments that Kids Marathi gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.

Other post by @Kids Marathi