×

PRASHANT PANSARE's video: Gavakadchya Goshti feat Marathi Kanya

@कोरठण खंडोबा ! वडगाव दर्याबाई ! Gavakadchya Goshti feat. Marathi Kanya.
Collaboration with Marathi kanya. कोरठण खंडोबा- हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात वसलेले एक गाव आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंच पठारावर वसले आहे. येथील मध्ययुगीन कोरठण खंडोबा मंदिर अनेक हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासच्या शिलालेखानुसार याचे बांधकाम शा.श. १४९१ (इ.स. १५६९च्या सुमारास) साली पूर्ण झाले[१]. इ.स. १९९७ मध्ये चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर (मार्गशीर्ष, शा.श. १९१९) गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार झाला. वडगाव दर्या (Famous for Stalactite and Stalagmite) हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आहे. येथील जगप्रसिद्ध लवण स्तंभ हे प्रेक्षणीय स्थळ आहे. गावापासून अंदाजे एक किलोमीटर खाली खोल दरी आहे. दरीच्या बाजुला डोंगर आहेत. या भागात दुर्मिळ व औषधी वनस्पती आढळतात. वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी, अभ्यासक येथे येतात. अनेक प्रकारच्या वनराईमुळे परिसर अतिशय निसर्गरम्य, मनाला लुभवणारा आहे. लवण स्तंभ, अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी यामुळे प्रवाशांची सतत गर्दी असते. दर्याबाई, वेल्हाबाई या दोन्ही देवींचे स्थान खाली दरीत आहे. दरीत उतरून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. जाताना येताना रस्त्यावर माकडे दिसतात. ही माकडे म्हणजेच देवीचे सैन्य आहे अशी लोककथा आहे. आधी मोराचं सैन्य होते. दरीत आल्यावर माकडांचे सैन्य झाले, अशी आख्यायिका आहे. ही माकडे माणसांना कसलाही त्रास देत नाहीत. कातळ खडकात दोन गुहा आहेत. एक वेल्हाबाईची आणि दुसरी दर्याबाईची. गुहेतून आत जाताना कातळ आहेत. वरच्या छताच्या बाजुनेच सतत पाणी ठिबकत असते. ते साठवण्यासाठी खाली टाक्या, हौद बांधलेले आहेत. ठिबकणारे पाणी त्यात साठते. जंगलातील प्राणी, पक्षी यांना प्यायला उपयोगी पडते. या पाण्यात कलशियम कार्बोनेट आहे. पाण्यातील क्षारांपासून लवण स्तंभ तयार होतात. येथे अधोमुख म्हणजे खाली आणि उधोमुखी म्हणजे वर असे दोन्ही प्रकारचे लवण स्तंभ आहेत. म्हणजे वरून खाली येणारे खालून वर जाणारे. वरचे पाणी खालच्या पाण्याला खेचते. त्यामुळे खालीही वर झेपावणारे उभट लवण स्तंभ तयार होतात. ही अनेक वर्षांपासून मंदगतिने चालणारी क्रीया अजूनही सुरू आहे. चुनखडीच्या प्रदेशात गुहा निर्माण होतात. तिथले पाणी क्षारयुक्त असते. अशा सतत टपकणाऱ्या पाण्यापासून लवण स्तंभ तयार झालेले आहेत. खडकाला चिकटलेले हे स्तंभ आहेत. एका ठिकाणी गोमुखातून पाणी पडते. हा निसर्गाचा चमत्कार पाहून आम्ही स्तिमित झालो. गुहेतून मंदिरात गेले की शेजारी परशुरामाचे मंदिर आहे. महादेवाची पिंडी आहे. पुढे दर्याबाईची व वेल्हाबाईची स्वयंभू मूर्ती आहे.

153

37
PRASHANT PANSARE
Subscribers
1.1K
Total Post
41
Total Views
200.8K
Avg. Views
4.9K
View Profile
This video was published on 2019-01-22 15:06:36 GMT by @PRASHANT-PANSARE on Youtube. PRASHANT PANSARE has total 1.1K subscribers on Youtube and has a total of 41 video.This video has received 153 Likes which are higher than the average likes that PRASHANT PANSARE gets . @PRASHANT-PANSARE receives an average views of 4.9K per video on Youtube.This video has received 37 comments which are higher than the average comments that PRASHANT PANSARE gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.PRASHANT PANSARE #MarathiKanya #KorthanKhandoba #PrashantPansare has been used frequently in this Post.

Other post by @PRASHANT PANSARE