×

PRASHANT PANSARE's video: - Pothholes Malganaga Temple Nighoj

@रांजणखळगे - Pothholes / Malganaga Temple Nighoj
'निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण अविष्कार - रांजणखळगे निघोज हे गाव तेथील रांजणखळग्यांमुळे जगभरात प्रसिध्द आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ह्या दोन तालुक्यांच्या सिमेवरील तसेच अहमदनगर पासून 70 कि.मी.अंतरावर असलेल्या निघोज येथील, कुकडी नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने नैसर्गिकरित्या जे असंख्य खड्डे तयार झालेले आहेत तेच रांजणखळगे. नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरश: विस्मयकारी चमत्कारच आहे. ह्या खड्डयांचा आकार रांजणा सारखाच असून ह्या कुंडातील पाणी दुष्काळातसुध्दा आटत नाही. अनेक वर्षापूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ह्या कुंडांची निर्मिती झाली असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे. कुकडी नदीच्या पात्रात साधारण 200 मीटर लांब व 60 मीटर रुंद इतक्या भागात खडकामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार आपणास पहावयास मिळतात. या रांजणखळग्यांना स्थानिक भाषेत ‘कुंड’ म्हणतात. निसर्गाने बहाल केलेल्या ह्या छानशा कुंडांमुळे कुकडी नदीच्या सौंदर्यात भर पडलेली आहे.कुकडीचे रांजणखळगे देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत असून भौगोलिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकही येथे येत असतात. रांजणखळग्यांची निर्मिती कशी झाली, कोणत्या भौगोलिक कारणांमुळे झाली ह्या सर्व बाबींचा अभ्यास करण्याकरीता जगभरातील तज्ञमंडळी आवर्जून भेट देत आहेत. रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आलेली असल्याने त्याची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. आपल्या महान महाराष्ट्रातील अजिंठा-वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, हेमाडपंथी प्राचिन मंदिरे अशा अनेक अद्भूत अविष्कारांप्रमाणेच रांजणखळग्यांचे आकर्षण जगभरातील पर्यटकांना, अभ्यासकांना, तज्ञांना भूरळ पाडत आहे. रांजणखळग्यांच्या परिसरात म्हणजेच कुकडी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस मळगंगा देवीची दोन मंदिरे आहेत आणि या दोन मंदिरांना जोडणारा राज्य सरकारच्या वतीने बांधण्यात आलेला झूलता पूल देखील बघण्यासारखा आहे. पूलाच्या मध्यभागी उभे राहून कुकडी नदीचे दर्शऩ नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस असलेल्या रांजणखळग्यांमुळे विलोभनीय दिसते. निसर्गाचा हा चमत्कार तासन् तास बघत रहावा वाटतो. दरवर्षी भरणाऱ्या मळगंगा मातेच्या जत्रेस लाखो संख्येने भक्तगण मोठ्या भक्तीभावाने मळगंगा मातेच्या दर्शनासाठी येत असतात. #रांजणखळगे Plz Like , Comments , Share & Subscribe.

47

5
PRASHANT PANSARE
Subscribers
1.1K
Total Post
41
Total Views
202.8K
Avg. Views
4.9K
View Profile
This video was published on 2018-11-20 18:21:36 GMT by @PRASHANT-PANSARE on Youtube. PRASHANT PANSARE has total 1.1K subscribers on Youtube and has a total of 41 video.This video has received 47 Likes which are lower than the average likes that PRASHANT PANSARE gets . @PRASHANT-PANSARE receives an average views of 4.9K per video on Youtube.This video has received 5 comments which are lower than the average comments that PRASHANT PANSARE gets . Overall the views for this video was lower than the average for the profile.PRASHANT PANSARE #रांजणखळगे #Pothhole Plz has been used frequently in this Post.

Other post by @PRASHANT PANSARE